संत्र्याची कॉफी

ND
साहित्य : दीड कप काळी कॉफी, अर्धा कप क्रीम, 1 मोठा चमचा साखर, 1 मोठा चमचा संत्र्याची लिक्युअर एका कपाला, सोललेले संत्र अर्धा कप, 2 मोठे चमचे संत्र्याचा रस.

कृती : जाड काचेच्या ग्लासमध्ये सोललेले संत्र घाला. त्यावर संत्र्याची लिक्युअर घाला व दहा मिनिटे झाकून ठेवा. म्हणजे लिक्युअर संत्र्यामध्ये मुरते. कॉफी व साखर एकत्र करून गरम करा व संत्र्याच्या फोडींवर ओता. वरून क्रीम घाला. क्रीमवर संत्र्याचा रस घालून सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा