मुलिगटॉनी सूप

ND
साहित्य : 1 मोठे चमचे भात, 1 कप खवलेलं नारळ, 3/4 कप पाणी, 1 मोठा चमचा बडी शोप, 2 तुकडे दालचिनी, 2 चमचे धणे, 1 मोठा चमचा जिरे, 1/4 चमचा मेथी, 2 मोठे चमचे तेल, 3 मध्यम गाजरे सोलून चिरलेली, 1 लहान कांदा चिरलेला, 1 लहान सलगम सोलून चिरलेला, 4 पाकळ्या लसूण चिरलेला, 1 लहान तुकडा आले चिरलेले, 2/3 कप मसूर डाळ धुतलेली, 3 मोठे टोमॅटो शिजवून सोललेले आणि चिरलेले, 1 चिमूटभर हळद पूड, 1 काडी कढी पत्ता, 1 मोठा चमचा मीठ, साडे पाच कप भाज्यांचे पाणी, 2 मोठे चमचे लिंबू रस.

कृती : सर्वप्रथम नारळाचे दूध काढून घ्या. नंतर तव्यात बडी शोप, दालचिनी, धणे, जिरे आणि मेथी एकत्र भाजा आणि त्याची पूड तयार करा. कढईत तेल घालून गाजर, कांदा, सलगम, लसूण आणि आले घालून 2 मिनिटे परता. नारळाचे दूध, भात आणि लिंबू सर्व सोडून इतर सारे पदार्थ घाला चांगले ढवळून 5 मिनिटे शिजवा. थोडे थंड झाल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करा आणि गाळा. सूप परत गरम करायला ठेवा त्यात दूध, भात आणि लिंबू रस घालून गरम गरम सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा