सणासुदीत गोडधोड खातो.आपण काजू कतली या मिठाई बद्दल ऐकले आहे आणि खळली देखील आहे. काजू कतली हे सर्वानाच आवडणारी मिठाई आहे. बहुतेक लोक बाजारातून काजू कतली विकत घेऊन आपल्या घरी आणतात. सध्या बाजारात काजू एवढा महाग असताना काजू कतलीचा भाव वाढणे स्वाभाविक आहे.काजू कतली महागडी मिठाई आहे. आपण घरी शेंगदाण्यापासून देखील शेंगदाणा कतली बनवू शकता. शेंगदाण्याची कतली खायला खूप चविष्ट असते आणि चव थोडी काजू कतलीसारखी असते. त्यामुळे काजुकटलीच्या जागी तुम्ही ते खूप कमी खर्चात बनवू शकता. चला तर मग या दिवाळीसाठी बनवा खास शेंगदाणा कतली.साहित्य आणि कृती जाऊन घेऊ या.
शेंगदाण्याची साले काढल्यानंतर ते सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. बारीक झाल्यावर चाळणीतून पावडर गाळून एका मोठ्या भांड्यात ठेवा.आता शेंगदाणा पावडरमध्ये मिल्क पावडर घाला , चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा.
गोडपणासाठी पाक तयार करा. कढईत एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घाला. चंगळ उकळू द्या. पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे आणि मिल्क पावडर घाला, ते एका पॅनमध्ये ठेवा आणि ते घट्ट गोळा होई पर्यंत शिजवा. मिश्रण सतत ढवळत राहा आणि गोळा तयार झाल्यावर कढई गॅस वरून खाली काढून घ्या. मिश्रण चांगले मळून घ्या आणि एका ट्रेमध्ये तूप लावून हे मिश्रण लाटून घ्या.