देशात गेल्या काही दिवसांत झालेले मोठे स्फोट

गेल्या काही दिवसांपासून देशात दहशतवाद्यांनी अनेक स्फोट घडवून आणले आहेत. यात शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.गेल्या काही वर्षांत झालेले असेच काही स्फोट आणि याची माहिती

13 मे 2008 : जयपुरमध्ये 12 मिनिटांमध्ये आठ साखळीबद्ध स्फोटात 65 ठार 150 हून अधिक जखमी.
जानेवारी 2008 : रामपुर येथील केंद्रीय राखीवदलाच्या शिबीरावर हल्ला, यात आठ ठार.
ऑक्टोबर 2007 : अजमेर येथील प्रसिद्ध दर्ग्यात स्फोट, दोन ठार.
ऑगस्ट 2007 : हैदराबादेत दहशतवादी हल्ल्यात 30 ठार 60 जखमी.
मे 2007 : हैदराबादेतील मक्का मशिदीत स्फोट, 11 ठार.
19 फेब्रुवारी 2007 : दिल्ली-अटारी लिंक एक्सप्रेसमध्ये स्फोट, 66 ठार. मृतांमध्ये अधिकांश पाक नागरिक.
8 सप्टेंबर 2006 : मालेगांवातील शब-ए-बारात या उत्सवातील स्फोटात 30 ठार, 100 जखमी.
11 जूलै 2006 : मुंबईच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटात 200 ठार 700 हून अधिक जखमी.
7 मार्च, 2006 : वाराणसीच्या संकट मोचन मंदिर आणि छावनी रेल्वे स्टेशनसह दोन भागात साखळी स्फोटात 20 ठार.
ऑक्टोबर 2005 : दीवाळीच्या अदल्या दिवशी राजधानीत झालेल्या तिन स्फोटात 62 ठार आणि शेकडो जखमी.
26 सप्टेंबर 2008 अहमदाबाद स्फोट 50 जणांचा मृत्यू झाला होता.

वेबदुनिया वर वाचा