अहमदाबाद आणि दिल्ली स्फोटात साम्य

अहमदाबादेत झालेल्या स्फोटांनंतर आता दिल्लीतील स्फोटातही दहशतवाद्यांनी गर्दीच्या ठिकाणांना आपले लक्ष केले आहे.

या दोनही शहरात झालेल्या स्फोटांमध्ये साम्य असून, वेळ, वार आणि जागा यांच्यात साम्य दिसून आल्याने इंडियन मुजाहीद्दीनच्या दाव्याला बळ मिळाले आहे.

अहमदाबादेत झालेल्या स्फोटांदरम्यान सायंकाळी सहाचीच वेळ दहशतवाद्यांनी निवडली होती. तर त्या दिवशी शनिवार होता.

आज दिल्लीत झालेले स्फोट हेही शनिवारी झाले आहेत. वेळही तीच असून, गर्दीची जागा म्हणून दिल्लीतील महत्त्वाच्या बाजारपेठांचा वापर करण्यात आला, त्यामुळे या दोनही स्फोटांमध्ये साम्य असून, पोलिस आता त्या दिशेने तपास करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा