धनत्रयोदशीला खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी कोणतेही काम सुरू करणे देखील शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून जीवनात सुख- समृद्धी कामना केली जाते. धनत्रयोदशीला नवीन वस्तू खरेदी करून त्याची पूजा करण्याची परंपरा देखील आहे परंतू या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अशुभ देखील मानले गेले आहे. तर जाणून घ्या कोणत्या अशा वस्तू आहे ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू नये.
धनत्रयोदशीला काळ्या रंगाचे वस्त्र किंवा दागिने खरेदी करू नये.
धनत्रयोदशीला तेल किंवा तूप असे पदार्थ आणू नये. या दिवशी दिवे लावायला तेल, तुपाची गरज भासत असली तरी त्याची व्यवस्था आधीपासून करावी.