साहित्य -
1 लीटर गायीचे दूध, 1 लीटर म्हशीचे दूध, 2 चमचे लिंबाचा रस, 1 1 /2 कप साखर.
सर्वप्रथम एका भांड्यात गायीचे आणि म्हशीचे दूध एकत्र करा आणि उकळी घ्या. त्याला ढवळत राहा आणि गॅस बंद करून तसेच ठेवा. या मध्ये लिंबाचा रस मिसळा आणि हळू-हळू ढवळत राहा. दूध नासायला तसेच ठेवा. फाटल्यावर किंवा नासल्यावर त्यावरचे पाणी वेगळे होणार आणि दुधाचे दही वेगळे होणार. एक मलमली कापड वापरून दही वेगळे करावे आणि पाणी वेगळे काढावे. ते पाणी फेकून द्या किंवा वेगळे ठेवून द्या. आता या दही किंवा छेना मलमलच्या कापड्यासह एका ताज्या पाण्याचा वाटीत किंवा भांड्यात ठेवा आणि या छेनाला 2 ते 3 वेळा धुऊन घ्या. जास्तीच पाणी काढण्यासाठी अर्धा तासापर्यंत कपड्याने बांधून लोंबकळतं ठेवा.
आता मलमलच्या बांधलेल्या कपड्याला एका पसरट ताटलीत उघडून ठेवा आणि आपल्या तळहाताचा वापर करून छेना चांगल्या प्रकारे मळून घ्या. या छेनाचे थोडे थोडे गोलाकृती गोळे बनवा साखरेच्या पाण्यात हे छेनाचे गोळे घाला आणि त्याला झाकून 8 ते 10 मिनिटे चांगली उकळी घ्या. गॅस बंद करा 10 ते 12 मिनिटे कुकर मध्ये ठेवा. एका भांड्यात रसगुल्ले काढून थंड होण्यासाठी ठेवा आणि थंड झाल्या वर सर्व्ह करा.