दिवाळी सण कसा साजरा कराल

शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (16:44 IST)
आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत व पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.
 
यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवितात, तर काही जण त्याचा रस (रक्‍त) जिभेला लावतात. 
 
दुपारी ब्राह्मणभोजन घालतात व वस्त्रदान करतात. 
 
प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषकात घेतले असेल, तो प्रदोषपूजा व शिवपूजा करतो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती