ठसवि जो बोध खेद । न राखी नुरवी भेद । काळावरी मारी पाद । ली ले नेंची ॥२॥
राग द्वेषां देयी लत्ता । मोहादिकांची जो सत्ता । लपवी त्या गुरुदत्ता । ला जेती मा ॥३॥
एक भक्ती असे जया । राहे निर्धारहा तया । वसे गंगा गोदा गया । तयापाशी ॥५॥
कुलशीला की जे काय । यमादिकाविना स्वीय । तारी कर्तृत्व ते हेय । सिंचिद्रूत ॥६॥