श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी । पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥१॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु । आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥२॥
ऐसें व्रत प्रख्यात । व्रत दैवत अनंत । जेणें होय माझें हित । कथामृत निरोपिजे ॥५॥
येणें पुण्य काय घडे । काय लाभतसे रोकडें । ऐसें मनींचें साकडें । फेडावें माझें स्वामिया ॥६॥