श्री दत्त माला मंत्र हा एक अत्यंत चमत्कारी मंत्र आहे. श्री दत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र एक पूर्ण मंत्र आहे. सर्व अडचणी दूर करण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, तणाव व नकारात्मकता यांचा प्रभाव कमी होण्यासाठी "श्रीदत्तमाला मंत्र" अतिशय प्रभावी ठरतो.
श्री दत्त माला मंत्र जपण्याचे नियम
स्नानोपरांत शुचिर्भुतपणे पूर्वाभिमुख बसुन "श्रीदत्तमाला मंत्र" हा सर्वप्रथम एखाद्या शुभ वार किंवा गुरुवार या दिवशी सलग 108 पाठ करुन सिध्द करावा लागतो.
हे संपूर्ण स्तोत्र म्हणजेच एक मंत्र असुन याची 108 वेळा आवर्तने करावयाची असते.
उच्चार नीट करावा.
हे वाचन सुरु असताना मध्येच उठणे- बोलणे टाळावे. वाचन एकसलग करावे.
प्रथम 108 पाठ पूर्ण झाल्यावर स्तोत्र सिध्द होईल. नंतर दररोज किमान एक ते कमाल 21 असे कितीही पाठ करता येतात.
श्रीदत्तमाला मंत्र जपल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
अनारोग्य यांच्या निवारणासाठी देखील हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे.
अत्यंत प्रभावी मंत्र श्री दत्तमाला मंत्र सिद्धी साठी सुरवातीस व अखेरीस 108 वेळा ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः हा जप करावा.
श्रीदत्तमाला मंत्र सिध्द झाल्यानंतर काही बंधने आयुष्यभर कटाक्षाने पाळावी लागतात. त्याबद्दल जाणून घ्या-
वर्षभरातील प्रत्येक गुरुवार, प्रत्येक पौर्णिमा, दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, चैत्र व अश्विन नवरात्रातील नऊ दिवस कोणत्याही स्वरुपात मांसाहार तसेच मद्यपान करणे वर्ज्य करावं लागतं.
शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी दत्ताचे दर्शन किंवा गुरुंचे दर्शन घ्यावे.
शक्य जितकं आणि शक्य तेव्हा गरिबांना आणि पशु- पक्ष्यांना अन्नदान करावे.