GuruCharitra Parayan Sankalp गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे. या प्रकारे तयारी करा-
साहित्य - एक चौरंग, एक पाट किंवा आसन, गुरुचरित्र पोथी, अक्षता, फुले, फुलांचा हार, तुळशीची पाने, २ सुपारी, २ विडयाची पाने, तूप, पंचामृतपाच फळं, अबीर, गुलाल, बुक्का, उदबत्ती, दिवा, कापूस, आरतीचे ताट, कापूरारती, धूपाटणे, चंदन, तांब्याची पळी, पंचपात्र, एक तांब्याचं ताम्हण आणि एक पितळेचे ताम्हण, पाणी, हात पुसण्यासाठी कापड. २ नाणी, २ अखंड दीप (एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा).
सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा. त्यांच्या आर्शीवाद घेऊन परायणाला सुरुवात करावी. सात दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत असावा. वाचन चालू असताना तुपाचा दिवा ठेवावा.
गुरुचरित्र पारायण संकल्प विधी
आचमन सुरु करताना पळी पंत्रपात्री डाव्या हाताला आणि ताम्हण उजव्या हाताला ठेवून आचमन सुरु करावे.
आचमन
डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावर घेऊन तीन वेळा आचमन करा
ॐ केशवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ नारायणाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ माधवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
मम (आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करून) आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं समस्ताभ्युदयार्थं च श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं सर्वारिष्ट शांतिपूर्वक- सकलमंगलावाप्त्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये । तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीगुरुदत्तात्रेयपूजनं च करिष्ये । तथा आसनादिकलशशंखघंटादीप- पूजनं च करिष्ये (नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा.)
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः ।