रामदास स्वामींचे जीवन चरित्र

जन्म : एप्रिल १६०८
मृत्यू : २ फेबुवारी १६८१
रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे काढली. राजकारण, धर्मकारण जाणीवपुर्वक अंतर्भुत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होय. करुणाष्टके, मनाचे श्लोक, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही त्यांची महाराष्ट्रात घरोघरी म्हटली जाणारी आरती.
समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.
 
दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वतः अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या (आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखात समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती