क्रिकेटच्या देवताला बघून मैदानात उतरणार्‍या शेफाली वर्माचे आता स्वत: सचिन बनले प्रशंसक

सोमवार, 2 मार्च 2020 (12:21 IST)
2013 मध्ये जेव्हा सचिन तेंडुकर हरियाणाविरुद्ध आपलं शेवटचं रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी रोहतक आले होते तेव्हा स्टेडियममध्ये हजारो प्रशंसकांच्या गर्दीत 10 वर्षांची शफाली देखील होती. तेंडुलकरची फॅन शफलीने तो सामना पूर्ण दिवस ग्राउंडवर उभं राहून बघितला होता. तेव्हा सचिनचं कौतुक बघून आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघून शफालीने म्हटलं की आता ती टेनिस बॉलने नव्हे तर लेदर बॉलने क्रिकेट खेळणार. सचिनच्या या फॅनने आज सचिनला आपल्या खेळचं कौतुक करण्यास भाग पाडले. 
 
ट्वेंटी 20 विश्वचषकाच्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात दमदार कामगिरी केल्यामुळे शफाली एक उगवती क्रिकेटपटू असून तिला लेडी सेहवाग अशी उपमा दिली जात आहे. स्वत: सेहवागने तिला रॉकस्टार म्हणून उपमा दिली आहे. तिच्या या कामगिरीमुळे सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी तिचं कौतुक केलं आहे. 
 
माजी भारतीय कर्णधार डायना इडुल्जीने शफालीचं कौतुक करत तिला खेळ सेहवागची आठवण करवून देतं असं म्हटलं होतं. तिच्या आक्रमक खेळ शैलीमुळे महिला क्रिकेटला नवीन ताजगी मिळाली आहे.
 
मिताली राजने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने शेफालीला संघात संधी मिळाली. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात युवा क्रिकेटपटू आहे. तिने जेव्हा मंगळवारी पदार्पण केले तेव्हा तिचे वय 15 वर्षे 239 दिवस होते.
 
भारतीय संघाची माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची प्रेरणा घेवून या खेळाकडे वळली. ती सचिनची खूप मोठी चाहती आहे. तिच्या यशामागे तिच्या वडिलांचा खूप मोठा हातभार असल्याचे ती सांगते. मुलगी असल्यामुळे अनेक क्रिकेट अकादमींनी तिला प्रशिक्षण देण्यास नकार दिला होता. क्रिकेट मुलींचा नव्हे तर मुलांचा खेळ आहे असे ऐकल्यावरही ती आपल्या मतावर ठाम होती आणि तिच्या जिद्दीला तिच्या वडिलांचा पाठिंबा.
 
तिने वयाचच्या आठव्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा अनके संघ ती मुलगी असल्यामुळे खेळवण्यास नकार देत होते. मुलांसोबत खेळताना काही दुखापत झाल्यावर तक्रार केली जाईल असं वाटत असल्यामुळे तिला खेळण्याची संधी मिळत नव्हती. अशात तिच्या वडिलांनी तिचे केसच कापून बॉयकट केली नंतर तिला मुलगा बनवून खेळवायला सुरुवात केली. बॉय कट केल्यावरच तिला एका अकादमीत प्रवेश मिळाला. शफाली दररोज सायकलवर घरापासून आठ किमी दूर जाऊन प्रशिक्षण घेत होती. शफाली मुलांसोबत खेळत असतानाही वडिलांनी काळजी न करता यामुळे ती अधिक पक्की होईल असा विश्वास दर्शवला. लहानपणापासूनच ती मुलांसारखं वागते. तिला जींस-टीशर्ट हेच कपडे घालणं आवडतं. 
 
शफालीचं आज सर्वीकडे कौतुक होत आहे. त्यामागे तिची मेहनत असल्याचे तिचे वडिल म्हणाले. त्यांनी सांगितले की मागील दोन वर्षांपासून तिने फास्टफूडला हात देखील लावलेला नाही. पनीर भुर्जी आणि बटाटे-मटारची भाजी तिची आवडती डिश आाहे. बाजारातील चाऊमीन आणि आलू टिक्की ती आवडीने खाते पण ते सर्व तिने सोडून केवळ आपल्या डायटवर पूर्ण लक्ष दिले. ती पूर्णपणे शाकाहारी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती