Ind Vs Afg :2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने दुसरा विजय मिळवला आहे. बुधवारी भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. याआधी, भारताने आपल्या पहिल्या सामन्यात 5 वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 65 विकेट्सने पराभव केला होता.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या 35 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने भारताकडून शानदार फलंदाजी करत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. सामन्यानंतर रोहित शर्माला 'मॅन ऑफ द मॅच' देण्यात आला.
भारताला पहिला धक्का 19व्या षटकात इशानच्या रूपाने बसला. तो रशीद खानकरवी इब्राहिम झद्रानच्या हाती झेलबाद झाला. तर रशीदने 26व्या षटकात रोहितला बोल्ड केले. रोहितने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी पूर्ण केली. यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 68 धावांची अभेद्य भागीदारी केली. कोहलीने 56 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. अय्यरनेही 23 चेंडूत 25 धावा केल्या.
तर अफगाणिस्तान संघाकडून कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने सर्वाधिक 80 धावांची खेळी खेळली. रहमानउल्लाह आणि इब्राही यांनी अफगाण संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण सातव्या षटकात बुमराहने ही भागीदारी मोडून काढत इब्राहिम झद्रानला (22) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हार्दिक पांड्याने रहमानउल्ला गुरबाजला बाद केले. गुरबाजने या कालावधीत 28 चेंडूत 21 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने रहमत शाहला एलबीडब्ल्यू केले. हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्यात चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी निश्चितच झाली. उमरझाई 69 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. तर हशमतुल्ला शाहिदला कुलदीप यादवने एलबीडब्ल्यू आऊट केले.