विश्वचषकात खराब कामगिरीनंतर शकीब अल हसनसोबत मारहाण!

बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (10:03 IST)
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. या संघाला नऊपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आणि सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. चार गुणांसह, हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. बांगलादेशने श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धचे दोन सामने जिंकले. नेदरलँड्ससारख्या संघाविरुद्धही बांगलादेशला 87 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
 
बांगलादेश संघाच्या खराब कामगिरीमुळे चाहते कमालीचे दु:खी झाले असून कर्णधार शकीबला त्याचा फटका सहन करावा लागला. शाकिबचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी त्यांना  घेरले आणि त्याला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेक चाहते त्याच्याशी भांडू लागले. शकिबसोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कसेबसे तरी त्यांना  गर्दीतून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत शाकिब एका ज्वेलरी शॉप मध्ये जातांना  दिसत आहे आणि काही लोकांनी त्याचवर हल्ला केला. 
हा व्हिडीओ या वर्षी मार्च महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे आणि बांगलादेशच्या खराब कामगिरीनंतर तो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. यावरून बांगलादेशचे चाहते संघाच्या कामगिरीने किती निराश झाले आहेत हे दिसून येते. या विश्वचषकात शाकिबने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आणि 17.33 च्या सरासरीने त्याला केवळ 104 धावा करता आल्या. तमिम इक्बालसोबतच्या वादानंतर त्याला सतत टीकेला सामोरे जावे लागले आहे.
 
 





Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती