मोहित शर्माच्या निवडीस आयसीसीचा हिरवा कंदील

सोमवार, 9 फेब्रुवारी 2015 (15:34 IST)
14 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त इशांत शर्माच्या ऐवजी मोहित शर्माचा भारतीय संघात समावेश करून घेण्यासाठी आयसीसीने हिरवा कंदील दाखवला आहे. अॅडलेड येथे झालेल्या तंदुरस्त चाचणीत इशांत शर्मा अनफिट ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. इशांत शर्माच्या जागी संघात संघात समावेश करण्यात आलेला मोहित शर्माचा तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याने 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. विश्वचषक स्पर्धेत ब गटात भारतीय संघाचा समावेश करण्यात आला असनू 15 फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा