भारत-पाकिस्तानचा आज महामुकाबला

रविवार, 15 फेब्रुवारी 2015 (08:57 IST)
जखमी खेळाडू व काम गिरीतील सातत्य नसणे यामुळे त्रस्त झालेल्या भारतीय संघासमोर आज रविवार पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. या दोन्ही संघातील इतिहास पाहिला तर भारताला विज मिळवणे सोपे जाणार आहे. 
 
विश्वचषकाच आतार्पतच पाच लढतींमध्ये भारताने पाकिस्तानचा सर्व सामन्यात पराभव केला आहे. 1992 पासून सिडनी येथील सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. सुपर संडेला होत असलेल या सामन्यात धोनी ब्रिगेड पाकिस्तानवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यासाठी   स्टेडिम पूर्णपणे खचाखच भरेल, असा विश्वास आयसीसीला वाटत आहे. अँडेलेड येथे 20 हजार भारतीय सामना पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी जिवाचा आटापिटा करतील. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात वारंवार पराभूत होणार्‍या धोनी ब्रिगेडला पाकिस्तानचा पराभव केल्यास मोठे मानसिक बळ मिळणार आहे. 
 
विराट कोहलीने अलीकडच्या सामन्यात फलंदाजी करताना सातत्य दाखवलेले नाही. भारतीय गोलंदाजांना सराव सामन्यात अफगाणिस्तानच्या दहा खेळाडूंना बाद करता आले नव्हते. भारतीय संघातील काही खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा विचार केला तर धोनीपुढे चिंता मोठय़ा प्रमाणावर असल्याचे स्पष्ट होते.

वेबदुनिया वर वाचा