कोहली पाकच्या विरुद्ध हा पराक्रम कराणारा पहिला भारतीय

रविवार, 15 फेब्रुवारी 2015 (21:18 IST)
विराट कोहली पाकिस्तानच्या विरुद्ध विश्व कपाच्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला ज्याने येथे त्याचा 22वा वनडे शतक मारला.  
 
कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले कारण सचिनने 2003 विश्व कपात पाकिस्तानच्या विरुद्ध 98 धावा काढल्या होत्या. त्याच सामन्यात पाकिस्तानच्या सईद अनवरने 101 धावांचा डाव खेळला होता.  
 
भारताने आतापर्यंत विश्व चषकाच्या पाच सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे.  

वेबदुनिया वर वाचा