विश्वकरंडक स्पर्धेमदील रविवारच्या बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी समालोचन करुन, या सामन्यामुळे भारतामध्ये आलेल्या उत्साहाच्या उधाणामध्ये आणखी भर घातली. बच्चन यांनी सामन्याच्या सुरुवातीला आपल्या खास शैलीत काही षटके समालोचन केले. कपिल, राहुल, शोएब यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंबरोबर समालोचन करण्याची संधी मिळणे ही माझ्यसाठी बहुमानाची बाब आहे. भारत 300 धावा करेल, असे भाकित मी वर्तविले होते. ते खरे झाले, अशा आशयाचे ट्विट बच्चन यांनी केले आहे.