अंतिम सामन्याचे नाणेङ्खेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजी घेतली. पण ऑस्ट्रेलियान गोलंदाजांच्या भेदक मार्यासमोर न्यूझीलंडच्या संघ मैदानावर ङ्खार काळ टिकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा अख्खा संघ 45 षटकात 183 धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलिया विजय तेव्हाच निश्चित झाला होता. पुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी विजयाची औपचारीकता पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून 34 व्या षटकात न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला आणि 2015 चा विश्वचषक खिशात घातला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेम्स फॉल्कनर हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला. त्याने तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क हा विश्वचषकमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते सर्वाधिक 22 बळी घेणार्या मिचेल स्टार्कला हा मालिकावीराचा पुरस्कार दिला गेला. ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकापूर्वी झालेल्या एका सामन्यात चेंडू लागून मृत्युमुखी पडलेल्या फिलिप ह्युजेला श्रद्धांजलीपूर्वक अर्पण करतो, असे कर्णधार मायकल क्लार्कने विजयानंतर सांगितले.
विश्वजेता ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकामध्ये केवळ एका सामन्यात पराभव झाला, तर एक सामना टाय झाला. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा भारतानंतर ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी चार विश्वचषक जिंकला होता.
ऑस्ट्रेलियाचा हा पाचवा वर्ल्डकप आहे. ऑस्ट्रेलिया 1987, 1999, 2003, 2007 आणि आता पाचव्यांदा 2015 चा विश्वचषक जिंकत विश्वजेता ठरला.