वर्ल्डकपला ‘स्पॉट फिक्सिंग’ची चिंता

गुरूवार, 5 फेब्रुवारी 2015 (11:42 IST)
क्रिकेट वर्ल्डकपला भ्रष्टाचाराचे गालबोट लागू नये यासाठी आयोजकांनी विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. हे एकप्रकारे आव्हानच असल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्ड्सन यांनी म्हटले आहे.
 
ते म्हणाले, यावेळी बक्षिसांच्या रकमेपाठोपाठ सुरक्षेवर खर्च केला जात आहे. सुरक्षेवर आत्तापर्यंतचा सर्वाधिक खर्च झाला. स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंगवर विशेष लक्ष राहील. भ्रष्टाचारमुक्त वर्ल्डकपसाठी विशेष काळजी घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा