ऑस्ट्रेलियात सुरू होणार्या आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाला अनुभवी खेळाडूंची उणीव चांगलीच भासत आहे. तसेच या संघातील नवोदित खेळाडूंकडे पुरेशी क्षमता असनूही त्यांच्यात लढाऊ वृत्तीचा अभाव दिसत असल्याचे वैयक्तिक मत माजी कर्णधार कपिल देवने व्यक्त केले आहे. 20111 साली भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणार्या तत्कलिन भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंना निवड समितीने यावेळी डावलले आहे. अनुभवी युवराज सिंग, हरभजन सिंग, सेहवाग, झहिर खान, नेहरा, गंभीर या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकले नाही. नवोदित खेळाडूंचा अधिक सहभाग असलेल्या भारतीय संघाकडे पुरेशी ऊर्जा तसेच उत्साह नक्कीच आहे, पण या नवोदित खेळाडूंमध्ये लढाऊ वृत्ती जागी होणे जरूरी आहे, असेही कपिल देव म्हणाला.