याचवेळी भारताच्या कानाकोपर्यात फटाक्यांच्या आतषबाजीत ‘दिवाळी’ साजरी झाली. ऑस्ट्रेलिया दौर्यात पराभवाच्या चक्रात सापडलेल्या भारतीय संघास लय सापडली नव्हती. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत भारताला सहज हरविणे शक्य असल्याचे पाकिस्तानला वाटत होते. मात्र, झाले उलटेच. भारताने पाकिस्तान संघाला सपशेल झोपविल्याने पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कराचीत काही चाहत्यांनी टीव्ही सेट रस्त्यावर आणून फोडले तर क्रिकेटपटूंविरोधात घोषणा देण्यात आल्या.