ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनर याला दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतील सलामीच्या लढतीस मुकावे लागणार आहे. फॉकनर याचे इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात पायाचे स्नायू दुखावले होते. यामुळे त्याला अर्धवट षटक सोडून मैदानाबाहेर जावे लागले होते. या सामन्यात फॉकनरने अष्टपैलू कामगिरी केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, फॉकनरच्या उजव्या पायाचे स्नायू दुखावल्याचे स्कॅन केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.