क्रिकेट विश्वचषक 2015 चे शानदार उद्घाटन

शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2015 (11:13 IST)
आजी-माजी क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे सुरुवात झाली. या रंगतदार सोहळ्यात अनेक कलाकार आपली कला सादर करत आहेत. आजी माजी क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत विविध देशांच्या संस्कृती दर्शन घडवत हा दिमाखदार सोहळा ख्राईस्टचर्चमदील नॉर्थ हेग्ले पार्कमध्ये सुरु आहे. त्यावेळी होगली पार्क येथे आयोजित समारंभात न्यूझिलंडमधील पारंपारिक लोकनृत्य स्थानिक कलाकारांनी सादर केले. 

वेबदुनिया वर वाचा