आयसीसी वर्ल्‍ड कप 2015: क्रिकेटच्या महाकुंभच्या भव्य उद्घाटन सोहळा

गुरूवार, 12 फेब्रुवारी 2015 (16:18 IST)
आयसीसी क्रिकेट वर्ल्‍ड कप 2015च्या टूर्नामेंटचा उद्घाटन सोहळा गुरुवारी न्यूझीलंडचे शहर क्राइस्टचर्च आणि ऑस्ट्रेलियाच्या   मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. दिलेल्या वृत्तानुसार, हा सोहळा फारच भव्य प्रकारे आयोजित करण्यात येत आहे. या   समारंभाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. क्राइस्ट चर्चामध्ये होणार्‍या या कार्यक्रमाचे प्रवेश निःशुल्क राहणार आहे.  
 
या कार्यक्रमात भाग घेणार्‍या सर्व 14 देशांची सांस्कृतिक झळक पाहायला मिळणार आहे. यात आस्ट्रेलियाचे जग प्रसिद्ध व्यक्तीदेखील यात येणार आहेत. क्राइस्टचर्चचे कार्यक्रम नॉर्थ हेग्ले पार्कमध्ये आणि मेलबर्नचा कार्यक्रम सिडनी मायेर म्युझिक बॉउलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.  
 
या समारंभात न्यूझीलंडचे प्रसिद्ध कलाकार सामील गिनी ब्लॅकमोर, हॅले वेस्टेंरा सहित सोलो3 मियो आपली प्रस्तुती देणार आहे. तसेच   क्रिकेट दिग्गज रिचर्ड हेडली, स्टीफेन फ्लेमिंग आणि न्यूझीलंडचे कर्णधार ब्रेंडन मॅक्लम देखील या कार्यक्रमात भाग घेणार आहे. दुसरीकडे मेलबर्नमध्ये होणार्‍या कार्यक्रमात जगातील माजी आणि सध्याचे दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत सांस्कृतिक आणि संगीतमय प्रस्तुती दिली जाणार आहे व आतिषबाजीचे सुंदर दृश्य बघायला मिळणार आहे.  
 
विश्व कपच्या दरम्यान आस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या चारी वॅन्यूवर या आठवड्याच्या शेवटी होणार्‍या सुरुवातीच्या सामन्यात स्टेडियम खचाखच भरलेले राहण्याची उमेद आहे. दोन सामन्यांच्या तिकिटांची विक्री झालेली आहे आणि मेलबर्न व हॅमिल्टनमध्ये होणारे बाकीचे दोन सामन्यांचे थोडेसे तिकिट शुल्लक राहिले आहे. टूर्नामेंटची स्थानिक आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जान हर्नडेन यांनी म्हटले की ते क्रिकेट चाहत्यांचा उत्साह बघून फारच खूश आहे. त्यांनी म्हटले आहे की पहिला चेंडू फेकण्या अगोदरच मागील काही दिवसांमध्ये 825000 तिकिटांची विक्री पूर्ण झाली आहे. त्यांनी सांगितले की आस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात  स्टेडियम पूर्ण भरण्याची उमेद आहे. काहीच हजार तिकिट उरले आहे आणि ज्यांना ते विकत घ्यायचे आहे ते घेऊ शकतात. एडीलेड ओवलववर भारत - पाकिस्तानमध्ये रविवारी होणार्‍या सामन्याचे तिकिट अवघ्या 20 मिनिटात विकण्यात आले होते.  

वेबदुनिया वर वाचा