काय सांगता, लसीकरण आणि कोविडच्या प्रोटोकॉल चे पालन केल्याने संसर्ग थांबेल

शनिवार, 13 मार्च 2021 (19:36 IST)
गेल्या 83 दिवसात देशात कोरोना कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक प्रकरणाची नोंद झाली असून ही भारतात कोरोनाव्हायरसची नवीन लाट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अधिकाधिक संख्येत लोकांना लसीकरण देऊन आणि कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरणं करून या वर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.    
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की गेल्या 24 तासात कोविड-19 ची 24,882 नवीन प्रकरणे सामोरी आली आहे. जेव्हा की 1 दिवसापूर्वी 23,285 प्रकरणांची नोंद झाली आहे आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. 20 डिसेंबर 2020 नंतर ही संख्या सर्वात अधिक आहे.जेव्हा कोरोनाबाधितांची 26,624 ची नवीन प्रकरणे नोंदली गेली होती.  
शास्त्रज्ञ या वर विचार करीत आहे की या प्रकरणांमध्ये का आणि कशी वाढ झाली , परंतु ते या वर सहमत आहेत की कोविड-19 च्या प्रोटोकॉल चे पालन करून आणि लसीकरण मोहिमेला वेगाने राबवून संसर्गाच्या प्रसारावर निर्बंध ठेवता येईल. 
सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजीचे संचालक अनुराग अग्रवाल म्हणाले की, त्यांच्या संस्थेतील शास्त्रज्ञ हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे की विषाणू मुळे  संसर्ग होण्याचे प्रकरणे वाढत आहेत की लोक खबरदारी घेत नाही ? त्यांनी म्हटले की हे अद्याप स्पष्ट झाले नाही की साथीच्या रोगाची नवीन लाट सुरू आहेत, परंतु काही गोष्टी नक्कीच अशा घडत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती