राज्यात कोरोना रूग्णांची संख्या ५५ हजारच्या पुढे

शनिवार, 20 जून 2020 (10:25 IST)
महाराष्ट्रात शुक्रवारी  ३८२७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १४२ रुग्णांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये १९३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  राज्यात सध्याच्या घडीला ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत तर ६२ हजार ७७३ करोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. मागील चोवीस तासांतील आकडेवारीनंतर महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १ लाख २४ हजार ३३१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५०.४९ टक्के इतका झाला आहे तर राज्यातील मृत्यू दर हा ४.७४ टक्के इतका आहे. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातले ट्विटही केले आहे. 
 
राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १४२ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५ हजार ८९३ इतकी झाली आहे.
 
मागील २४ तासांमध्ये जे मृत्यू नोंदवण्यात आले त्यात ८९ पुरुष तर ५३ महिलांचा समावेश होता. १४२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ७४ रुग्ण होते. तर ५७ रुग्णांचे वय हे ४० ते ५९ या वयोगटातील होते. ११ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. मुंबईत ११४, ठाण्यात २, नाशिकमध्ये ३, धुळे ३, जळगावात ३, सोलापूरमध्ये १ तर औरंगाबादमध्ये ८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
 
राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत आहेत. पाठवण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती