नाकावाटे दिली जाणारी लस 26 जानेवारीला सामान्यांसाठी बाजारात येणार

रविवार, 22 जानेवारी 2023 (10:25 IST)
भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली iNCOVACC  ही नाकावाटे देण्यात येणारी लस 26 जानेवारीला बाजारात येणार आहे. कंपनीचे चेअरमन कृष्णा इला यांनी ही माहिती दिली आहे. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.हिंदुस्तान टाइम्स ने ही बातमी दिली आहे.
 
डिसेंबर मध्ये सरकारने या लशीची घोषणा केली होती. सरकारी रुग्णालयात ही लस 325 रुपयाला तर खासगी रुग्णालयात ही लस 800 रुपयांना मिळणार आहे.

Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती