कोरोनाचा स्टील्‍थ व्हेरिएंट किती धोकादायक? चीनमध्ये वाढत आहे केसेस

बुधवार, 16 मार्च 2022 (15:14 IST)
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून येथे 11 शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे तर 3 कोटी लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार मंगळवारपर्यंत येथे कोरोनाचे 5200 नवीन रुग्ण आढळले. येथे कोरोनाचे नवीन रुग्ण आल्यानंतर शेजारील देशांची चिंता वाढत आहे. चीनमधील कोरोनाच्या नव्या लाटेसाठी स्टेल्थ ओमिक्रॉनला जबाबदार धरण्यात येत आहे.
 
चीनमधील कोरोनाच्या नवीन लाटेसाठी वेरिएंट स्टील्थ ओमिक्रॉन किती आणि कसा जबाबदार असून किती धोकादायक आहे तसेच याचा संसर्ग झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसू शकतात हे जाणून घ्या-
 
स्टील्थ व्हेरियंटला कोरोनाचे BA.2 व्हेरियंट म्हणूनही ओळखले जात असून विषाणूचा हा प्रकार शोधणे अवघड असल्याचे सांगितले जात आहेत. याचे कारण त्याचे स्पाइक प्रोटीन आहे. तज्ञांप्रमाणे तपासणीमध्ये हे शोधणे कठीण आहे कारण या स्ट्रेनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये असे उत्परिवर्तन झाले आहे. पीसीआर चाचणीमध्ये त्याची उपस्थिती शोधणे कठीण होत आहे. अशात चाचणीत ते सहजासहजी पकडले जात नाही.

हा कोरोनाचा नवीन प्रकार नाही कारण या BA.2 प्रकारामुळे भारतात तिसरी लाट आली. ओमिक्रॉनच्या या प्रकारात काही अनुवांशिक बदल झाले आहे त्या आधारावर तज्ञांनी त्याला 'स्टेल्थ व्हेरिएंट' असे नाव दिले. 
 
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणते, BA.2 प्रकार हा ज्या मुख्य विषाणूपासून विकसित झाला आहे तितकाच धोकादायक देखील आहे. याआधीही तज्ज्ञांनी या विषाणूपासून सावध राहण्याचा सल्ला दिलेेेला आहे. हे ओमिक्रॉनपासून विकसित असून स्टेल्थ ओमिक्रॉन प्रथम श्वसनमार्गावर परिणाम करते.
 
सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा स्टिल्थ प्रकाराचा संसर्ग होतो तेव्हा चक्कर येणे आणि थकवा येणे यासारखी लक्षणे दिसूून येतात. संसर्ग झाल्यानंतर 2-3 दिवसांनी ही लक्षणे रुग्णामध्ये दिसू लागतात. शिवाय इतर लक्षणांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायूंचा थकवा, थंडी वाजून येणे आणि हृदय गती वाढणे अशा लक्षणांचा समावेश आहे.
 
कोरोनाचे हे प्रकार चीनमधील नवीन लाटेसाठी जबाबदार आहे. इतकेच नाही तर फिलीपिन्स, नेपाळ, कतार आणि डेन्मार्कमध्येही त्याची प्रकरणे दिसून येत आहे. तज्ज्ञांप्रमाणे कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे खबरदारी घेण्यात चुकु नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती