राज्यात मंगळवारी ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात मंगळवारी ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.