मुंबई महापालिकेचा निर्णय : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवागृह

शनिवार, 9 मे 2020 (19:20 IST)

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी आता स्वतंत्र शवागृह तयार केले जाणार आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण (Special Mortuary house Corona Virus death) वाढत आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळा नातेवाईक लवकर येत नाहीत. कित्येकदा नातेवाईक न आल्याने हे मृतदेह शवागृहात पडून राहतात. त्यांची लवकर विल्हेवाट लावणे गरजेचे असते. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी शवागृहाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे निर्देश गटनेता बैठकीत देण्यात आले आहेत.

त्याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. अनेकदा रुग्णालयातील बेड फूल्ल झाले आहेत, असे सांगत खासगी रुग्णालय रुग्णांवर उपचार करताना टाळाटाळ करतात. पालिकेच्या नियमानुसार, खासगी रुग्णालयात गरीबांसाठी 20 टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती