पंतप्रधानांची आज सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक

बुधवार, 8 एप्रिल 2020 (09:35 IST)
पंतप्रधान मोदींनी आज कोरोनाच्या आपत्तीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसंदर्भातील पत्र संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना पाठवले.

विरोधी पक्षांकडून सातत्याने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली जात होती. मात्र करोनामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वित्त विधेयकांच्या मंजुरीनंतर १६ मार्च रोजी संस्थगित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी विरोधकांशी संवाद साधलेला नाही.आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आर्थिक समस्येबाबत आग्रही भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला दोन पत्रे पाठवली असून त्यात करोनामुळे गरीब कुटुंबांच्या हालअपेष्टा, त्यांना गरजेची असलेली आर्थिक मदत अशा विविध मुद्दय़ांवर पंतप्रधानांनी प्राधान्याने लक्ष घालण्याची विनंतीही करण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती