फायझरच्या टॅब्लेटच्या आपत्कालीन वापरला मान्यता

गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (09:41 IST)
कोरोनापासून संरक्षण व्हावं म्हणून लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र अनेक लोक इंजेक्शनच्या भीतीपोटी लस घेण्याचं टाळत असल्याचं समोर आलं आहे.
 
अशा लोकांसाठी आता गोळीच्या रुपानं पर्याय समोर आला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं Pfizer च्या Paxlovid टॅब्लेटच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. 
 
फायझरची कोव्हिड टॅबलेट ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी आहे. या टॅबलेटचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल, असा दावा कंपनीनं केला आहे.
 
कोरोनाचे निदान झाल्यानंतर आणि लक्षणे दिसल्यानंतर 5 दिवसांच्या आत पॅक्सलोविडचा वापर शक्य तितक्या लवकर करावा, असं सांगण्यात आलं आहे.
 
या गोळीचा वापर केल्यास कोरोनापासून संरक्षणात्मक कवच प्रदान करण्यासाठी ती महत्त्वाची ठरेल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती