Omicron Variant:मुंबईच्या धारावीत ओमिक्रॉनचा शिरकाव

शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (17:52 IST)
देशात ओमिक्रॉनच्या कोरोनाच्या नवीनव्हेरियंट च्या धोक्यादरम्यान मोठी बातमी येत आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. असे सांगितले जात आहे की मुंबईतील धारावीमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचे नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. बीएमसीने सांगितले की हा माणूस टांझानियाहून परतला होता आणि त्याला सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याच वेळी, ओमिक्रॉन विषाणूचा धोका देखील वाढत आहे. मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचा ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. टांझानियाहून परत आलेल्या व्यक्तीमध्ये नवीन व्हेरियंटची पुष्टी झाली आहे. त्याला सध्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल आहेत. बीएमसीने ही माहिती दिली आहे. मुंबईतील धारावी यापूर्वीही कोरोनाचे हॉटस्पॉट राहिले आहे. पुन्हा एकदा नवीन व्हेरियंट मिळाल्याने चिंता वाढली आहे.
मुंबईत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचे तिसरे प्रकरण समोर आले आहे.49 वर्षीय व्यक्ती4 डिसेंबर रोजी टांझानियाहून मुंबईत परतली होती. सदर व्यक्ती धारावी परिसरातील रहिवासी असून त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टमध्ये ओमिक्रॉन व्हायरसची पुष्टी झाली आहे. मात्र, त्याच्यामध्ये विषाणूची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. ही व्यक्ती धारावीतील मशिदीत मौलाना आहे . आश्‍चर्याची बाब म्हणजे मौलाना यांनी  अद्याप करोनाची लस घेतलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती