Corona Cases In India | देशात अॅक्टिव्ह केसेसमधील वाढ सुरुच

शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (21:31 IST)
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली. कालच्या दिवसात 42 हजार 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 533 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
 
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 982 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 533 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 726 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
 
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 18 लाख 12 हजार 114 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 74 हजार 748 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 26 हजार 290 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 11 हजार 76 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
 
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 48 कोटी 93 लाख 42 हजार 295 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती