मरकज कार्यक्रम टाळता आला असता :शरद पवार

गुरूवार, 2 एप्रिल 2020 (17:01 IST)
दिल्लीत निजामुद्दीनमध्ये आयोजित केलेला मरकज कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झाला आहे. हा कार्यक्रम टाळता आला असता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निजामुद्दीन प्रकरणावर आपलं मत मांडलं.
 
दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये तबलीग ए जमात या मुस्लीम संघटनेच्या मरकज या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक एकत्र आले आणि त्यातून कोरोना व्हायरसची अनेकांना लागण झाली. हे लोक देशभरात गेले असल्यानं कोरोनाचा फैलाव वेगवेगळ्या ठिकाणी झाला. शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना निजामुद्दीनच्या कार्यक्रमावर भाष्य केलं. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता,” असं शरद पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, असं आवाहन पवार यांनी केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती