महाराष्ट्र आता कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर

मंगळवार, 1 मार्च 2022 (07:36 IST)
महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. महाराष्ट्र आता कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. सोमवारी  ५०० हून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात ४०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ६५ हजार ७०५वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ४३ हजार ७०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात ९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ७७ लाख ११ हजार ३४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ७८ लाख ७५ हजार १०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६५ हजार ७०५ (१०.१०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३२ हजार ८८६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती
राज्यात एकूण ४ हजार ६२९ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४ हजार ४५६ रुग्णांना त्यांची आर.टी.पी.सी.आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ हजार ३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी ८ हजार ३३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १ हजार ०४९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती