Maharashtra Corona Report: राज्यात कोरोनाच्या ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू
मंगळवार, 2 जून 2020 (09:42 IST)
राज्यात सोमवारी ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या २३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १).
नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे.
नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ मे ते २८ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील २२ मृत्यूंपैकी मुंबई ९, नवी मुंबई -५, औरंगाबाद -३, रायगड – २, बीड -१, मीरा भाईंदर -१ आणि ठाणे १ असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४१,०९९), बरे झालेले रुग्ण- (१६,९८५), मृत्यू- (१३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,७८९)
ठाणे: बाधित रुग्ण- (९९४१), बरे झालेले रुग्ण- (३६३७), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०८९)
पालघर: बाधित रुग्ण- (१०७१), बरे झालेले रुग्ण- (३९१), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४७)
रायगड: बाधित रुग्ण- (११४८), बरे झालेले रुग्ण- (५९८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०७)
नाशिक: बाधित रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
धुळे: बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)
जळगाव: बाधित रुग्ण- (६९६), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
पुणे: बाधित रुग्ण- (८०४५), बरे झालेले रुग्ण- (३७९३), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९१४)
सोलापूर: बाधित रुग्ण- (९३३), बरे झालेले रुग्ण- (४२३), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४०)
सातारा: बाधित रुग्ण- (५२७), बरे झालेले रुग्ण- (१७७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३४)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५०९), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५५)
सांगली: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५४३), बरे झालेले रुग्ण- (१०१२), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६३)
जालना: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)
परभणी: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
बीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
नांदेड: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
अकोला: बाधित रुग्ण- (६०३), बरे झालेले रुग्ण- (३२६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४८)
अमरावती: बाधित रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९२)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)
वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
नागपूर: बाधित रुग्ण- (५९२), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०३)
वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
भंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (३६), बरे झालेले रुग्ण- (१०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)
एकूण: बाधित रुग्ण-(७०,०१३), बरे झालेले रुग्ण- (३०,१०८), मृत्यू- (२३६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,५३४)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३२९४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ६७४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७०.६९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.