भारतीय नौदलाचं जहाज मालदिवच्या माले बंदरात दाखल

शनिवार, 9 मे 2020 (09:26 IST)
मालदिव इथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्रसेतु अभियानांतर्गत भारतीय नौदलाचं जहाज आय एन एस जलाश्व मालदिवच्या माले बंदरात दाखल झालं आहे.
 
माले इथं भारतियांची तपासणी आणि ओळखपत्र वितरणाचं काम सुरू झालं आहे. आतापर्यंत ७३२ भारतियांनी परतीसाठी नोंदणी केली असून यात १९ गर्भवती आणि १४ बालकांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती