भारतातील गुगलचं ऑफिस बंद, एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण

शुक्रवार, 13 मार्च 2020 (11:03 IST)
करोना व्हायसमुळे गुगलचं भारतातील कार्यालय बंद करण्यात आलं आहे. गुगलच्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्यानं कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुगलं आपलं बंगळुरूमधील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
तसंच कंपनीनं कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. १० एप्रिल पर्यंत या कर्मचाऱ्यांना घरून काम करावं लागणार आहे. 
 
करोनाची लागण झालेला गुगलचा कर्मचारी काही दिवसांपूर्वीच परदेश दौऱ्यावरून परतला होता. या कर्मचाऱ्यामध्ये करोनाची लक्षण दिसल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला करोना झाल्याचं स्पष्ट झालं.
 
जगातील अनेक देशांमध्ये करोना व्हायरस पसरत असून भारतात 70 हून अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती