दिलासादायक बातमी ! राज्यात कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली

मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (23:48 IST)
राज्यात दिवसभरात 6,107 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 16,035 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. दिलासादायक बातमी म्हणजे की राज्यात कोरोना बाधित असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे. 
 
आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,16,243 एवढी झाली आहे या पैकी 75,73,069 जण बरे झाले आहे. रिकव्हरी रेट 96.89 टक्के  एवढा आहे. 
 
राज्यात कोरोनारुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या राज्यात 96 हजार 69 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
 
राज्यात आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून आता पर्यंत कोरोनामुळे 1 लाख 43 हजार 155 रुग्ण  मृत्युमुखी झाले असून राज्याचा कोरोनामृत्यूदर 1.83 टक्के एवढा झाला आहे. 
 
सध्या राज्यात 2,412 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहे तर, 6,39,490 जण होम क्वारंटाईन आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती