चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाला असून राज्य सरकारने यासाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार रेड आणि कंटेनमेंट क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात आजपासून अर्थात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड अनिल परब यांनी दिली आहे.
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी करत केवळ रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर जिल्ह्यांना सशर्त एसटी महामंडळाला केवळ जिल्हा अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतील निवडक मार्गांवर शुक्रवारपासून एसटी बससेवा सुरू होणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी काही नियम देखील जारी करण्यात आले आहेत.