राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. सोमवारी (दि.1) राज्यातील कोरोनाची आकडेवारी हजाराच्या आली असताना आता यामध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर मंगळवारी राज्यात 10 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली होती. मात्र,यामध्ये मोठी वाढ झाली आहे. रुग्ण वाढत असताना बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 15 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात 1078 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1095 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात (Coronavirus in Maharashtra) 15 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 28 लाख 43 हजार 792 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 12 लाख 965 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 497 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 919 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.