केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार, गेल्या 24 तासांत देशात 3688 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. शुक्रवारी 3377 नवे बाधित आढळले, म्हणजेच कालच्या तुलनेत आज 311 अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या देखील 18,684 वर पोहोचली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 883 ने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत आणखी 50 जणांचा मृत्यू झाल्याने देशातील एकूण मृतांची संख्या 5,23,803 वर पोहोचली आहे.