कोरोनाच्या या थैमानात वेगवेगळे प्रकरणं बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे लक्षणं दिसत असूनही रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. अशात निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीला धोका असून त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. अशात रिर्पोट कोरोना निगेटिव्ह आली असेल तरी लक्षणं जाणवतं असतील तर हे करा-
लक्षणांकडे लक्ष देणे
कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर स्वत:कडे दुर्लक्ष करु नये. लक्षणांकडे लक्ष असू द्यावे. सर्व लक्षणांची नोंद करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दिवसभरात किमान तीन वेळा तापमान, ऑक्सिजन लेवल, ब्लड प्रेश आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासत राहावी.