महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, नियंत्रणासाठी केंद्राची पथक येणार

शनिवार, 6 मार्च 2021 (18:48 IST)
महाराष्ट्रात सतत रुग्णसंख्येची वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पाच महिन्यानंतर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. राज्यात २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून केंद्र सरकारही सतर्क झाली आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून पथकं पाठवण्यात येणार आहेत. 
 
राज्यात ५ मार्च रोजी २४ तासात १०,२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या आसपास झाली आहे. दरम्यान विदर्भात कोरोनाचा स्फोट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात नागपूरातून 1183 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे दोन दिवसाचे विकेंड लॉकडाऊन असतांना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर निघाल्याचं चित्र आहे.
 
तर अमरावती जिल्हात आज दिवसभरात 631 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती