कोरोनामुळे लग्नसमारंभांना बंदी जाणून घ्या कुठे घालण्यात आली ही बंदी

मंगळवार, 9 मार्च 2021 (20:34 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरत आहे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी नाशिक मध्ये लग्नसमारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 15 मार्च नंतर घालण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येतं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांवर बंदी लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पत्रक देखील प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे. ज्या ठिकाणी गर्दी होईल असे कार्यक्रम घेण्यास प्रशासनाने बंदी लावण्यात आली आहे. तसेच धार्मिक विधीसाठी एकावेळी फक्त पाच पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. 
जिल्हा प्रशासन ने शनिवार आणि रविवार बाजार पेठ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे अशी सूचना देण्यात आली आहे. 
प्रशासन ने सांगितले आहे की रेस्टारेंट, खाद्य गृहे ,बार हे सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहतील.
तसेच धार्मिक स्थळे शनिवार रविवार वगळता सकाळी सात ते रात्री सात पर्यंत सुरू असणार. असे ही सांगण्यात आले आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा  सुरू राहणार आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासन कडून देण्यात आले आहे.    
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती