राज्यातील कोरोनाबाधितांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची तब्बल 93 टक्के

बुधवार, 14 जुलै 2021 (23:07 IST)
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची तब्बल 93 टक्के इतकी रुग्णसंख्या आहे. सर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहे. त्यानंतर कोकणातील मुंबई,  ठाणे आणि रायगडमध्येही कोरोना नियंत्रणात नाही. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये कोरोनाचा जोर ओसरताना दिसत नाहीये. त्यामुळे या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.  
 
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी देशात अजूनही कोरोना रुग्ण वाढतायत. यात पाच राज्यांत सर्वाधिक रुग्णवाढ होतेय. त्यात पहिल्या स्थानी केरळ आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. केरळात 30%रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात 20%रुग्ण आहेत. त्या खालोखाल तामिळनाडूत 8.5%, आंध्रात 7.3% आणि ओडिशात 6.5% रुग्ण आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती